Bookganga वरील e-books, bites of India, Facebook अशी आधुनिक माध्यमं वापरत खासकरून हिंदुस्तान आणि हिंदुस्तानींबद्दल 'जे जे उत्तम, उदात्त, उन्नत महन्मधूर ते ते' आपल्यापर्यंत पोहोचवणार्या श्री. माधव अनंत विद्वांस यांचा जन्म २४ जुलै १९४९ रोजी महाराष्ट्र राज्यातल्या सातारा जिल्ह्यातील वाई येथे झाला. त्यांनी माध्यमिक शिक्षण द्रविड़ महाविद्यालय, वाई येथे व पदविका अभ्यासक्रम वाईच्याच किसनवीर महाविद्यालयातून संप्पन्न केला. लहानपणापासून वाचन, इतिहास व चित्रकलेची आवड आहे. बरेच मित्र शेतकरी घरातले होते त्यामुळे बांधावरच बालपण गेलं, वाईच्या कृष्णाघाटावर पोहण्याची मजाही औरच होती. काही काळ छत्रपति हायस्कुल, भवानी नगर, इंदापूर इथे शिक्षक म्हणून सेवारत होते. त्यानंतर सहकारी वस्तुभांडारात व लेखनिक ,विश्वकोशामध्ये नकाशा विभागात अभ्यागत म्हणून काम केलं. त्यांची नोकरी आणि आवड हा छान मिलाप घडला.
रंगावली स्पर्धेत पारितोषिक मिळवलं. पुणे रायगड व आसपास सायकलवर भटकंती केली. पद्मविभूषण पंडित सातवळेकरांच्या १९७५ सालीच्या 'सद्धर्म' च्या नेपाळ विशेषांकामध्ये मध्ये पहिली कविता व लेख लिहिला. २००५ साली पंचशील परिक्रमा हे बौद्ध स्थळांची माहिती देणारं त्यांचं पुस्तक प्रकशित झालं .
माधवजी भारतीय जीवन प्राधिकरण मधे तब्बल ३८ वर्षं कार्यरत होते. लेखन करायला लागणारी एकाग्रता व उसंत नोकरी करतांना मिळत नव्हती, मात्रं वाचन अव्याहत चालू असायचं. सेनानिवृत्तीनंतर वाचनाची, ही, दीर्घ मुदतीची ठेव खुली करून त्यांनी लेखनाद्वारे व्यक्त व्हायला सुरुवात केली.
www.bookganga.com वर भारतातील ६००० स्थळांची एकत्रित माहिती देणारा ७०० पानांचा 'भारतीय पर्यटन कोष' किंवा ' encyclopedia of Indian tourism ' हा ebook स्वरूपात २०११ मधे प्रकाशित केला. तो आजमितीला फक्त ५५० रुपयांमधे उपलब्ध आहे. फेसबुक वर आरुढ झाल्यानंतर आतापर्यंत ५००० मित्र झाले व त्यावर त्यांनी लिहिलेल्या त्यांमजकूरांवर likes चा आकडा १२ लाख पार गेला आहे. ३६५ दिवसांच्या सुमारे ४००० नोंदी संकलित करून महत्वाच्या व्यक्तींचे वाढदिवस ,जयंती ,पुण्यतिथीचा दिवशी त्यांचे कार्याबद्दल विकिपीडिया व मराठी विश्वकोश तसेच वृत्तपत्रात आलेली माहिती मित्रांना त्याच दिवशीही फेसबुकचे माध्यमातून ते देत असतात. सातारचे स्थानिक पाक्षिक "दक्ष " मध्ये हि माहिती बरेच दिवस येत होती. मीडिया मॅगझीन "बाइट्स ऑफ इंडिया" मध्ये दर बुधवारी पर्यटन विषयक लेख येतो, तसेच दैनिक प्रभात मध्ये आठवड्यातून तीन वेळा विविधा या संपादकीय सदरात स्फुट लेख येतो.
सध्या पाणीपुरवठा खात्यातील निवृत्त सेवक संघटनेचे कार्यकर्ते म्हणूनही ते क्रियाशील आहेत. सातारचे प्रसिद्ध तालीम मास्तर व्यायामाचार्य कै. भिडे गुरुजींचे ते नातजावई होत. त्यांचे वडील अनंत विद्वांस वाई नगरपरिषदेत मुख्याधिकारी होते. माधवजींनी प्रवासाची आवड बर्यापैकी जपली. सहकुटुंब राजस्थान ,मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक ,गुजरात ,तामिळनाडूत चेन्नई, उटी, ओरिसा ,काश्मीर ,हिमाचल एवढा भाग पाहिला. सहलीला जाण्याअगोदर काय बघायचे याची माहिती करून मगच प्रवास केला. या उत्कृष्ठ नियोजनाचं फलित म्हणजेच पर्यटन कोष (encyclopedia of Indian tourism). हे संकलन इंग्रजीत आहे. सांप्रत ते "बाइट्स ऑफ इंडिया" मधून मराठी व इंग्रजी भाषेतून साप्ताहिक लेखनमालिकेच्या रुपातही प्रसीद्ध होत आहे व आतापर्यंत ३५ लेख झाले आहेत. एका लेखात साधारण एक जिल्हा, त्याचा इतिहास व पर्यटन विशेष अशी साकल्याने माहिती दिली जाते. हे करतांना तसंच अन्य संदर्भ नूतनिकृत करायला ते विसरलेले नाहीत.
गृहदक्ष पत्नि सौ नीलिमा, मुलगी सौ अनघा-जावई संदीप ,नातु ओजस, विधिद्न्य मुलगा आणि सून श्री रोहित व सौ केतकी असा परिवार आहे. तर्कतीर्थ लक्षमणशात्री जोशी हे त्यांचे आदर्श होत तर गोनीदा आवडते लेखक.
खालील छायाचित्रात ते सौ. नीलिमा विद्वांस यांच्या खांद्यावर हात ठेवून माधवजी दूरवरच्या प्रदेशाकडे अंगुलीनिर्देश करत हितगूज करत आहेत. हे फक्त प्रतीकात्मक आहे. हा हात त्यांनी मोठ्या मनाने आपल्याही खांद्यावर ठेवलेला आहे.
माधवजी संकलनाचं काम करताहेत ते अतिशय मोलाचं आहे. इतर अनेकांनीही या दिशेने कार्यरत होणं आवश्यक आहे. याची जाणीव मला प्रकर्शाने झाली तो २०१८ सलातला प्रसंग उधृत करतो. आपले पंतप्रधान मोदी सांगतात की, प्रत्येक भारतीयानं किमान ५ परदेशी लोकांना भारतात पर्यटनासाठी आमंत्रित करावं. प्रसंग होता माझ्या यूरोपियन मित्रांबरोबर सहभोजनाचा. मी दरवर्षी प्रमाणं विषय काढला. ठिकाणं सुचवली. यावेळेला नवीन असलेलाएक सदस्य म्हणाला "we are scared of coming to India. There are so many wrongdoings. Specially with women." इतरही काही सदस्यांनी याच पद्धतिचं मत मांडलं. एक समाज म्हणून मुळातच आपल्यापासून जरा दूर राहिलेलं बरं असं मागणार्या देशांमधे या अशा बातम्या विषारी ठरत आहेत. " you are suggesting since 2016. We thought about it but ended up visiting Thailand, Vietnam ". चर्चेने बरीच नकोशी दिशा घेतल्यावर मुखक्षेप करणं अपरिहार्य झालं. " we know each other since २०१६. Tell me a single instance when anyone of you felt unsafe in my company? ... Then do you believe all Indians are like those portrayed in the news? many of us those you know come here leaving their family in India. Did any thing happened to their families back in Indida? have you heard? " अशा स्वरुपाचे प्रश्न विचारल्यावर संभाषणाची दिशा बदलली. नवीन सभासदाला चूक उमगली. " no no Puru. Absolutely not. But that's what we see in our media. ".... !?!
बांधवांनो आता मला सांगा, माधवजी जी माहिती अव्याहतपणे व्रतस्थ होऊन आपल्यापर्यंत पोहोचवताहेत तीच ती उत्तम उदात्त उन्नत महन्मधूर, परदेशी लोकांच्या गळी उतरवली पाहिजे. गरज असेल तिथे भाषांतर करूनही हे पोहोचवायलाच हवं. Facebook वर १२ लाख likes १२०० लोकांनी मिळून दिले असं धरूया. त्यातले फक्त १२० जणं जरी दूत बनले तरी हिंदुस्तान बद्दल जगात आशादायक संदेश नक्की जाईल. चला, या तेलावर प्रक्रिया करून ते उत्तम उदात्ततेचं इंधन बनवूया!
आंग्ल भाषेत s लावून अनेकवचन होतं. भरपूर माहिती, द्न्यान असलेला १ विद्वान असेल तर ती विद्वत्ता वाटून अनेक विद्वानांच्या तोडीचे झालेले १ च विद्वान म्हणजे आपले लाडके माधव विद्वांस! त्यांना दिल से सलाम, शुभेच्छा, अभिनंदन!!
बडोद्याचे साहित्यप्रेमी अजातशत्रू श्रीमंत हिंमतबहादूर जितेंद्रसिह गाईकवाड यांची माधवजिंशी भेट झाली तो अविस्मरणीय क्षण. गाईकवाड हे इतिहास प्रेमी असून सयाजीराव यांच्यावरील विद्वंस यांनी फेस बुक वर टाकलेली पोस्ट वाचून त्यानं फोन केला तेंव्हा पासून त्यांची मैत्री झाली आहे .
लेखन: पुरुदत्त रत्नाकर, संदर्भ: रोहित विद्वांस
-----------------------------------------------------------------------------------
८ टिप्पण्या:
माहितीपूर्ण लेख. माधवजींसारख्या व्यक्ती आपल्या समाजासाठी भुषण आहेत. त्यांच्याविषयी लिहिलेला हा अभ्यासपूर्ण लेख वाचनीय आहे.
खूप माहितीपूर्ण लिखाण
लेख छानच. शीर्षक आवडलं ब्लॉगचं
Lekh chanach
Mast
उत्तम लेख
माहितीपूर्ण लेख
खूप छान! माधवजींच्या कार्याला आणि व्यासंगाला प्रणाम!
टिप्पणी पोस्ट करा